आरोप
सावरकरांचा राष्ट्रध्वजाला विरोध होता.
वस्तुस्थिती
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतून तयार झालेला भारताचा तिरंगा, मादाम कामा यांनी जर्मनीतल्या स्टुटगार्ड इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत २१ ऑगस्ट १९०७ ला यादिवशी फडकावला होता.
घटना समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद हे ध्वज समितीचेही अध्यक्ष होते. त्यांना तार पाठवून सावरकरांनी विनंती केली होती की राष्ट्राच्या ध्वजावर केशरी पट्टा असावा आणि चरख्याऐवजी शौर्याचे प्रतिक असलेलं चक्र असावं. सावरकरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं होतं. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, अभिमानानं स्वतंत्र भारताचा धर्मचक्रांकित तिरंगा आणि हिंदुमहासभेचा भगवा ध्वज असे दोन्ही ध्वज आपल्या घरावर उभारून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
पण असे असतानाही बदनामी कोणाची होते? सावरकरांची! आणि स्तुतीपात्र कोण आहे? तर आपल्या राष्ट्रध्वजाला उघडउघड कवडीमोलाचे समजणारे गांधी!
राष्ट्रध्वजावरून चरख्याचं उच्चाटन झाल्यामुळे आणि खादीऐवजी रेशमी कापडाची योजना केल्यामुळे महात्मा गांधी या ध्वजावर नाराज झाले. ३ ऑगस्ट १९४७ च्या हरिजनच्या अंकात महात्मा गांधीं लिहितात, काँग्रेसचा खादीचा तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला गेला नाही याबद्दल मला अत्यंत खेद होतो. संघराज्याच्या नव्या ध्वजामध्ये चरखा आणि खादी यांना स्थान नसेल तर माझ्या मते तो ध्वज कवडीमोलाचा आहे.