आरोप
समलैंगिक संबंधांचा
वस्तुस्थिती
‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात हा खोटा आरोप करण्यात आला होता. पण त्यानंतर सावरकर अनुयायांनी तत्काळ न्यायालयीन कारवाई सुरू केल्यानंतर या पुस्तकातून हा बिनबुडाचा आरोप वगळला गेला.
परंतु याच पुस्तकात नेहरूंच्या वैयक्तिक चरित्रहीनते बद्दल अनेक खुलासे केले आले आहेत. (ज्यांचा इथं उच्चारही करणं शक्य नाही, ज्यांना इच्छा असेल त्यांनी स्वत: हे पुस्तक वाचावे, प्रस्तावना वाचली तरी पुरेशी आहे.) काँग्रेसने याबद्दल नेहमीच मौन पाळले आहे. आणि या पुस्तकाच्या निर्मितीत स्वत: श्रीमती इंदिरा गांधी यांची अमुल्य मदत झाली असल्याचं लेखकांनी म्हटलं आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.
नेहरू आपले व्यक्तीगत आयुष्य कसे जगले याबद्दल कोणी काहीच आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु जर व्यक्तीगत संबध जर देशहिताच्या विरुद्ध जात असतील तर मात्र प्रश्न विचारलेच पाहिजेत.
‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात नेहरूं संबंधी असे लिहिले आहे की लॉर्ड माउंटबँटननी अशी स्वैच्छिक कबुली दिली की भारतीय नेत्यांसोबत चाललेल्या वाटाघाटीतील गुप्त गोष्टींची चर्चा ते आपल्या पत्नीबरोबर जरुर करत असत; शिवाय, ज्या बाबी नेहरूंना ते अधिकृतपणे सांगू शकत नव्हे त्यांची वाच्यता नेहरुकड़े करण्यासाठी लेडी माउंटबॅटन यांचा वेळोवेळी वापर करत.
याच पुस्तकात आणखीन काही तथ्ये पुढे आली. लेखक माउंटबॅटन यांच्या ध्वनिमुद्रित संभाषणाधारे म्हणतात “मधल्या काळात भारतीय पंतप्रधान व त्यांच्या (माउंटबॅटन यांच्या) पत्नी एड२विना यांचा स्नेह चांगलाच जमून आला. एडि२वना माउंटबॅटनसारख्या स्त्रिया सार्या जगात व त्यातल्या त्यात १९४७ च्या भारतात तर अधिकच दुर्मिळ होत्या. शंका आणि औदासिन्यतेच्या कोशातून नेहरूंना बाहेर काढण्यात ही आकर्षक, कुलीन, बुद्धिवान आणि प्रेमळ महिला सर्वात योग्य होती! कधी चहापानाच्या वेळी, कधी मोगल उद्यानात फिरताना तर कधी व्हॉइसरॉय निवासाच्या तलावात पोहोताना नेहरूंच्या मनावरील खिन्नतेचं पटल आपल्या आकर्षक, मोहक वागण्यानं दूर करत प्रसंगातून मार्ग काढत त्या सहजपणे आपल्या पतीच्या प्रयत्नांना साथ देत.”
यावर कोण बोलणार? याचं स्पष्टीकरण आज जनतेला कोण देणार?.