आरोप ८ -स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या दैवताचा, शिवरायांचा अपमान करतील?

आरोप

सावरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि बलात्काराचं समर्थन केलं

वस्तुस्थिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि बलात्काराचं समर्थन केलं हा आरोप अत्यंत मूर्खपणाचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानलं होतं. शिवाजी महाराजांची पहिली आरती त्यांनीच लिहिली होती. ज्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रकरणावरून सावरकरांवर टीका केली जाते, ती गोष्टच मुळी एक दंतकथा आहे. सावरकरांचा प्रश्न असा आहे की, आपण महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे, पण अशा दंतकथा रचून आपण आपल्या शत्रूला आमच्या बायकांवर अत्याचार केलेत तरी चालेल, तुमच्या बायका नेहमीच सुरक्षित राहतील असे खुले आश्वासन का द्यावे? स्वत: शिवाजी महाराजांच्या काकूला नासिक मध्ये गोदावरी नदीवरून पळवून नेले आहे.

‘सद२गुण विकृती’ या लेखातील आधीच्या प्रकरणात हिंदू महिलांवर होणार्‍या मुसलमानी अत्याचारांची सविस्तर चर्चा करताना टिपू सुलतानाचा पराजय केल्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षेनं बघणार्‍या हजारो पिडीत हिंदू महिलांना मुक्त करण्याकडे मराठा सैन्यानं दुर्लक्ष केल्याबद्दल सावरकरांनी टीका केली आहे.

हिंदूच्या बायका पळवून नेणं, त्यांचं धमारतर करणं, छळ करणं यात मुस्लीम स्त्रिया नेहमीच आघाडीवर होत्या याचे अनेक दाखले देऊन ते विचारतात की अशा दोषी बायकांना शासन व्हायला नको का? बायकांचे सगळे गुन्हे माफ करण्याच्या सद्गुण विकृतीला विरोध करताना त्यांनी शूर्पणखा आणि त्राटिका यांचे रामायणातील दाखले दिले आहेत. याचा अर्थ सावरकरांनी बलात्काराला प्रोत्साहन असा होत नाही. आता यांचे असे म्हणणे आहे का की शूर्पणखा आणि त्राटिका यांच्यावर बलात्कार झाले होते?

बलात्कार झालेली स्त्री ही कधीच भ्रष्ट किंवा पतीत नसते तर तिचा स्वीकार करण्यास नकार देणारे तिचे कुटुंबियाच खरे पतीत आहेत असे त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे, यावरून त्यांचा स्त्रियांसंबंधी दृष्टीकोन स्पष्ट होतो. या प्रश्नावर “महिलांनी बलात्काराची वेळ आली तर प्रतिकार न करता दातात जीभ चावून आणि श्वास रोखून आत्महत्या करावी असा गांधीचा सल्ला किती विकृत आहे किंवा हिंद स्वराज्य या आपल्या चोपडीत अनेक ठिकाणी वांझ आणि वेश्या या शब्दांचा वापर शिवी म्हणून करणारी व्येी महात्मा कशी ठरते याबद्दल आज सावरकरांना नाहक बदनाम करणारे तथाकथित बुद्धिवादी सांगू शकतील का?”

सावरकरांच्या हजारो पानांच्या साहित्यातून कुठलं तरी एक संदर्भहीन वाक्य शोधून त्यांच्यावर टीका करणारे, नेहरूंनी केलेला शिवरायांचा अपमान कसा विसरतात? आपल्या ‘Glimplsess of World History” या ग्रंथात नेहरू लिहितात “विजापूरच्या सरदाराची (अफझलखानची) दगलबाजीने केलेली हत्या इत्यादी शिवाजीच्या कृत्यांमुळे आमच्या दृष्टीने त्याची किंमत कमी ठरते.”

नेहरूंचे एक बरे आहे; आधीच वाचन कमी आणि त्याहून वाचले त्याची जाणीव त्याहून कमी! ज्या पापी अफजलखानाच्या केलेल्या वधाबद्दल नेहरू अधिकारवाणीने शिवरायांना दागाबाज ठरवतात त्याच अफजलखानाने शिवरायांवर केलेल्या स्वारीच्या आधी जनानखान्यात डांबलेल्या शेकडो स्त्रियांची केलेली हत्या सोयीस्कर रित्या विसरतात! क्रूरकर्मा अफजलखानाला मारणे मानवी अधिकारांचा भंग! आणि जनानखान्यात बलात्काराने भरलेल्या शेकडो स्त्रियांची क्रूर हत्या? त्याकडे ह्या पंडितजींचे सोईस्कर दुर्लक्ष? आता यांचे वंशज परक्या रोहिंग्या मुसलमानांबद्दल गळा फोडून रडतात पण १९९० साली स्वकीय काश्मिरी हिंदूंचा हत्याकांडाबद्दल, त्यांच्या बायकांच्या सामुहिक बलात्काराबद्दल, ५ लाखांहून अधिक काश्मिरी हिंदू निर्वासितांबद्दल का मौन पाळतात ते हे कळले!

हजारो हिंदूची कत्तल करणार्‍या आणि शेकडो राजपूत राजकन्यांना आपल्या जनानखान्यात कोंडणार्‍या अकबराला ‘द ग्रेट’ आणि ज्यांच्या मुळे आज हिंदू जिवंत आहेत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना दगलबाज म्हणणारे नेहरू ज्यांचं दैवत आहेत, अशीच विकृत माणसे सावरकरांवर आरोप करणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *