आरोप ३ -स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद आणि नेहरूंचा द्विराष्ट्रवाद

आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द्वि-राष्ट्रवादाचा पुरस्कार केला याबद्दल पुरावा म्हणून सावरकरांनी १५ ऑगस्ट १९४३ ला नागपूर इथं केलेलं एक कथित वक्तव्य नेहमीच पुढे केले जाते.

वस्तुस्थिती

काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे “ I have no quarrel with Mr. Jinnah’s two nation theory. We Hindus, are a nation by ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations” हे विकृत करून छापलेले वक्तव्य वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं असल्याचं स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लगेचच स्पष्ट केलं होतं.

swatantryaveer-savarkars-nationalism

दि. १९ ऑगस्ट १९४३ या दिवशी ‘दै. काळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली विस्तृत मते जागेअभावी अथवा हेतुत: विपर्यस्त स्वरुपात मांडून स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे प्रणेते आहेत हे खोटे वृत्त प्रकाशित झाले आहे. मूळातच जगभरातील मुसलमान स्वत:ला खलिफाच्या नेतृत्वाखालील धार्मिक राष्ट्र मानत आले आहेत आणि यादृष्टीने मुसलमान स्वत:ला वेगळे राष्ट्र मानतात. परंतु वस्तुस्थितीनुसार, राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने हिंदू हेच राष्ट्र आहे, कारण अनादिकालापासून तेच इथे बहुसंख्येने आहेत आणि मुस्लीम एक अल्पसंख्यांक व आक्रमक जमात आहे. मुस्लिमांच्या या धोरणामुळे भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाल्यामुळे सावरकरांनी हिंदुसभेच्या कार्कार्त्यांना फाळणी विरुद्ध लढण्याचे आदेश दिले होते.

द्वि-राष्ट्रवादाचा सिद्धांत हा मुळातच १८८५ साली सर सय्यद अहमद यांनी मांडला होता त्यानंतर उर्दू कवी इक्बाल याने त्याचा पुरस्कार केला आणि शेवटी जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने ही मागणी उचलून धरली. यात सावरकरांचा काहीही संबंध नाही. हे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट होते. पुन्हा हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की, उद्धृत केलेलं वक्तव्य विपर्यास करणारं असल्याचं सावरकरांनी लगेचच स्पष्ट केलं होतं.

आता खरोखर फाळणीला कोण जबाबदार होते?

थोडक्यात सांगायचे तर नेहरूंनी स्वत:च आपण फाळणीला कारणीभूत असल्याचे बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं! पण या विषयी अधिक माहितीही जाणून घेतली पाहिजे.

लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना तयार केली होती. ती योजना काँग्रेस मान्य करणार नाही याची त्यांना खात्री होती. पण नेहरूंना ती योजना मान्य झाली तर ते काँग्रेसकडून ती मान्य करून घेतील याचीही त्यांना पक्की खात्री होती. मग लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना मान्य करून घेण्यासाठी, ते नेहमी उपयोगात आणत असलेली एक कल्पना वापरली. सिमल्याचं व्हॉईस रिगल लॉज महनीय व्यक्तींच्या रहाण्यासाठी सज्ज करण्यात यावं असा आदेश लॉर्ड माउंटबॅटन यांनी दिला. त्यासाठी केवळ ३३३ जणांचा अधिकारी, कर्मचारी वर्ग सिमल्याला तयारीसाठी पाठवण्यात आला. आठ दिवसांनंतर लॉर्ड माउंटबॅटन आणि लेडी माउंटबॅटन, पंडीत नेहरूंना तिथं रहायला घेऊन गेले. त्या रात्री नेहरूंना फाळणीची योजना वाचायला देण्यात आली. सकाळी नेहरूंनी सांगितलं की, काँग्रेस ही योजना कदापि मंजूर करणार नाही. पण दिवस संपायच्या आतच नेहरूंनी काही अटी बदलून ती योजना मान्य केली.

दिवसभरात असं काय घडलं की नेहरूंनी ती योजना मान्य केली? या मागे नक्की कोणतं कारण होतं?

आम्हाला माहित नाही! पण फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट या पुस्तकात लॉर्ड माउंटबॅटन यांच्या ध्वनिमुद्रित मुलाखतीवर आधारित स्पष्टीकरण दिले आहे.

His wife’s friendship with the Indian prime minister had grown too. Women like Edwina Mountbatten were rare in the world and rarer still in the India of 1947. No one had been better able to draw Nehru from his shell when moments of doubt and depression gripped him than the attractive aristocrat who radiated so much compassion, intelligence and warmth. Often, over tea, a stroll in the Mogul Gardens, or a swim in the viceregal pool, she had been able to charm Nehru out of his gloom, redress a situation and subtly encourage her husband’s efforts.

“मधल्या काळात भारतीय पंतप्रधान व त्यांच्या (माऊन्टबॅटन यांच्या) पत्नी एड्विना यांचा स्नेह चांगलाच जमून आला. एड्विना माऊन्टबॅटनसारख्या स्त्रिया साऱ्या जगात व त्यातल्या त्यात १९४७ च्या भारतात तर अधिकच दुर्मिळ होत्या. शंका आणि औदासिन्यतेच्या कोशातून नेहरूंना  बाहेर काढण्यात ही आकर्षक, कुलीन, बुद्धिवान आणि प्रेमळ महिला सर्वात योग्य होती! कधी चहापानाच्या वेळी ,कधी मोगल उद्यानात फिरताना तर कधी व्हॉइसरॉय निवासाच्या तलावात पोहोताना नेहरूंच्या मनावरील खिन्नतेचे पटल आपल्या आकर्षक ,मोहक वागण्याने दूर करत प्रसंगातून मार्ग काढत त्या सहजपणे आपल्या पतीच्या प्रयत्नांना साथ देत.”

आता नेहरूंनी काही अटी बदलल्या, त्या कुठल्या?

बदललेली एक अट म्हणजे सत्तांतराचा दिवस खूप आधीचा निवडण्यात आला. जी सर्वात मोठी चूक असल्याचं पुढे सिद्धच झालं. आधी फाळणी होऊन सत्तांतर झालं असतं तर दोन्ही राष्टांची सरकारं नीट स्थापन झाली असती, सैन्य दलं, पोलीस दलं व्यवस्थित कार्यरत झाली असती आणि फाळणीनंतर झालेला हिंदूंचा संहार, दंगली आटोक्यात आणता आल्या असत्या. दंगली, नरसंहार होत असताना आपलं सरकार पार गोंधळून गेलं होतं, अशी घटना घडली तर ती आटोक्यात आणण्याची कोणतीही योजना सरकारकडे नव्हती. सत्तास्थापनेची घाई झाल्यामुळे नेहरूंनी, लॉर्ड माउंटबॅटन यांची फाळणीची योजना काँग्रेसकडून मंजूर करून घेतली आणि केवळ दहा आठवडयात सत्तांतर घडवलं गेलं.

नेहरू, पटेल, लियाकतअली आणि जीना यांची सत्तेची भूक या सगळ्याला कारणीभूत होती, असं फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट या पुस्तकात स्पष्ट म्हटलं आहे. मग द्विराष्ट्रवादाचं जनकत्व कोणाकडे जातं?

सत्तेची लालसा, मुस्लीम लीगची स्वप्नं आणि काँग्रेसनं केलेलं त्यांचं लांगूलचालन, का लेडी माउंटबॅटन यांचा नेहरूंवरचा प्रभाव?? थोडक्यात काय, सावरकरांचा द्विराष्ट्रवादाशी सुतराम संबंध नाही. उलटपक्षी त्यांनी अखंड हिंदुस्थानसाठी दिलेल्या लढ्याकडे मात्र आपण जाणूनबुजून दुर्लक्ष करतो आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *